अजित मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी सासवड जि.पुणे व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड यांच्या विरुद्ध फसवणुकी प्रकरणी माजी आमदारासह संचालक व व्यवस्थापन समितीवर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे गणेगाव दुमाला येथील सचिन गरुड व दोन इतर यांना 2019 मध्ये व्यवसाय वाढीसाठी कर्ज हवे असल्याने त्यांनी अजित मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड यांच्याकडे दोन वेगवेगळे कर्जासाठी मागणी केली असता सदर बँकेने शेतकरी बांधव सचिन गरुड यांच्या गणेगाव दुमाला येथील जमिनीचे गहाणखत करुन घेत अनेक कागदपत्रे घेतले होते,मात्र त्यानंतर सदर अजित मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड या दोन्ही बँकांकडून त्यांना कर्ज होईल असे सांगण्यात आले होते.वेळोवेळी टाळाटाळ करत राहिले,मात्र दरम्यान एका कर्जात चाळीस लाख तर एका कर्जात पंचवीस लाख असे पासष्ठ लाख रुपये कर्ज मंजूर करुन त्याबाबत जमिनीवर बोजा लावून कर्जदारांच्या कर्जाची रक्कम त्यांना न देता सर्व पतसंस्थेचे संस्थापक,चालक व व्यवस्थापक यांनी संगनमत करुन स्वतःच्या खात्यामध्ये वर्ग करुन घेतली,तर सदर कर्ज होत नसल्याने सचिन गरुड त्यांच्या शेतीकामात व इतर कामात व्यस्त राहिले असताना सन 2023 मध्ये त्यांना कर्ज थकल्याने जमीन जप्तीची नोटीस आली असता त्यांनी तहसीलदार कार्यालय येथे जाऊन चौकशी केली असता सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला,त्यांनतर त्यांनी याबाबत शिरुर न्यायालयात दावा दाखल केला असता न्यायालयाने याबाबत योग्य सुनावणी घेत शिरुर पोलिसांना सदर प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले,याबाबत सचिन बाळासाहेब गरुड रा.गणेगाव दुमाला ता.शिरुर जि.पुणे यांनी शिरुर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार न्यायालयाच्या आदेशाने शिरुर पोलिसांनी माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे,दिलीप नारायण वाल्हेकर,बाळासाहेब काळे,अजिंक्य अशोक टेकवडे,विजया अशोक टेकवडे,दिनेश श्रीकांत घोणे,भूषण सुभाष गायकवाड, सतीश महादेव जाधव,प्रदीप दिगंबर जगताप,गणेश अंकुश जगताप सर्व रा.सासवड ता.पुरंदर जि.पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम हे आहे.सदर जमिनिची सरकारी किंमत दोन कोटी बहात्तर लाख बारा हजार असताना ती फत्त 64 लाख 50 हजार किंमतीत विक्री केली आहे.याप्रकरणी आपणास योग्य न्याय न मिळाल्यास आपल्या कुटुंबासह अमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकरी बांधव सचिन गरूड यांनी दिला आहे.
Friday, 19 September 2025
Home
शिवपट्टन टाइम्स
अजित मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी व पतसंस्था फसवणुक प्रकरणी माजी आमदारासह 11 जणांवर शिरूर पोलिसात गुन्हा दाखल..
अजित मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी व पतसंस्था फसवणुक प्रकरणी माजी आमदारासह 11 जणांवर शिरूर पोलिसात गुन्हा दाखल..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment