जामखेड प्रतिनिधी
दिनांक 27 मे 2025 रोजी पाटोदा (खामगाव, भवरवाडी ) ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ. वर्षा धनंजय काळाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी निवडी दरम्यान सरपंच सौ.छाया अशोक कवादे व ग्रामपंचायत सदस्य सौ. परिगाबाई पोपट शिंदे, सौ.राणी शांतीलाल शिरसाठ, सौ.प्रियांका प्रदीप माने, सचिन शिंदे, पप्पू पारवे इत्यादी उपस्थित होते.
उपसरपंच पदाचा निवडणुकीत कोणताही अर्ज न आल्यामुळे सौ. वर्षा काळाने यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
त्यावेळी तेथे सुनील निंबाळकर, सदाशिव कवादे, पांडू शिंदे, बाळू मिसाळ, दादा शिरसाठ, अमोल गाडेकर, आजिनाथ भवर, राजू पठाण, शांतीलाल शिरसाठ, प्रदीप माने, संदीप कर्डीले, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रशासकीय अधिकारी म्हणून खुरंगुळे साहेब यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
No comments:
Post a Comment