जामखेड ( वार्ताहर)
- खर्डा येथे दिनांक 28 मे 2025 रोजी वेळापूर मठाचे मठाधिपती श्री. ष. ब्र.१०८ सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांची गाव प्रवेश मिरवणूक व संगीतमय इष्टलिंग पूजा मोठ्या उत्साहात पार पडली.
सकाळी नऊ ते बारा या वेळेत ग्रामप्रवेशाची मिरवणूक शिवमय वातावरणात पार पडली. महिलांनी व मुलींनी कलश घेऊन मिरवणुकी सहभाग घेतला. महाराजांची रथामध्ये बसवून मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये होडगी येथील महिला भजनी मंडळी यांचाही सहभाग होता.
खर्डा येथील सर्व लिंगायत समाज बांधव या कार्यक्रमात सहभागी झाले. दुपारी चार वाजता संगीतमय इष्टलिंग महापूजेस सुरुवात झाली व संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत ही पूजा चालली. शिवभजन व भक्तीरसात सर्व परिसर दुमदुमून गेला.
श्री ष. ब्र. १०८ सदगुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत शिवदीक्षा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात एकूण 66 समाज बांधवांनी शिवदीक्षा घेतली. शिवदिक्षेनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.दोन दिवसीय इष्टलिंग पूजा, शिवदीक्षा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन लिंगायत समाज खर्डा यांनी आयोजित केला होता.
No comments:
Post a Comment