जामखेड प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस सौ.मनिषा मोहळकर आणि भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष महादेव ओंबासे बालपणीचे वर्गमित्र पुन्हा एकदा राजकीय वर्गात नवा अध्यायाची सुरवात करण्याच्या तयारीत दिसत आहे.
भारतीय जनता पार्टित राजकीय सुरवात करत दोघांनीही पक्षात आपली स्वताची ओळख निर्माण करत तालुका आणि जिल्हा स्तरावर पदाची जबाबदारी मिळवली आहे.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मोठा जनसंपर्क आणि मित्रपरिवार जोडत स्व:ताचे राजकीय वलय निर्माण केले असल्यामुळे मनिषा मोहळकर नान्नज पंचायत समिती गणातुन तर महादेव ओंबासे अरणगाव गणातुन पंचायत समिती निवडणुक लढण्यास सज्ज झाले आहेत.सद्य परिस्थितीत दोघेही नान्नज आणि अरणगाव गणातुन प्रथम पसंतीचे भाजपचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मनिषा मोहळकर यांनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून महीलांसाठी सामाजिक कार्य करत असताना आपल्या कर्तृत्वाने राजकीय नेतृत्वही सिध्द केलं आहे. तर महादेव ओंबासे यांनी स्थानिक निवडणुकांमध्ये चांगल्याप्रकारे नेतृत्व करत तालुका पातळीवरही राजकीय नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं वेळोवेळी सिध्द केलं आहे.
दोघांसाठीही जमेची बाजु म्हणजे दोघेही भारतीय जनता पार्टिचे पदाधिकारी आहेत आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू आहेतं,
सभापती प्रा. राम शिंदेसाहेबांनी उमेदवारीच्या माध्यमातून आशिर्वाद दिल्यास दोघेही पंचायत समिती सदस्य होऊ शकतात आणि पुन्हा एकदा बालपणीचे वर्गमित्र पंचायत समिती मध्येही एकत्र राजकीय अभ्यास करताना दिसु शकतात अशी चर्चा जनतेतून व्यक्त केली जात आहे.
दोघांचे ५ वी ते १० वी चे शिक्षण हे अरणगाव येथे झाले असल्याने त्यावेळेसचे वर्गमित्र अनेक वर्षानंतर राजकारणाच्या माध्यमातुन एकाच राजकीय विचारधारेत पुन्हा एकदा एकत्र आले असल्याने स्वकर्तृत्वावर राजकारणात आपली ओळख निर्माण केलेल्या या दोन्ही युवा नेतृत्वांना एकाचवेळी राजकारणात नशीब अजमाविण्याची संधी मिळु शकते.
दोघांनीही पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू केली असली तरी अंतिम निर्णय हा माननीय सभापती महोदय प्रा.राम शिंदे साहेब घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी भावना दोघांनीही बोलताना व्यक्त केली.
No comments:
Post a Comment