जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात भाजपा कडून तिन्ही जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून प्रत्येक इच्छुक उमेदवार हे जोरदार तयारी करीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
जामखेड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती असे तीन गट व सहा पंचायत समिती गणाची निवडणूक होणार आहे, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात तब्बल तीन वर्षांनी लागला त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आठ वर्षांनी घेण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाला करावी लागत आहे. निवडणूक त्यावेळेस लागेल अशा परिस्थितीत सर्वच पक्षातील इच्छुकानी गेल्या तीन वर्षापासून लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात केल्यामुळे त्यांची मोठी दमछाक झाली होती. परंतु येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यापर्यंत निवडणूक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले असल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाची निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी करण्याकरिता इच्छुकांच्या जोरदार हालचालींनी वेग घेतला आहे.
इतर पक्षात सध्या सामसूम दिसत असून काही जण आरक्षण जाहीर झाल्यानंतर भूमिका घेणार असल्याचे सांगत आहेत.परंतु भाजपाकडून सध्या इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांनी राज्यात कामाच्या माध्यमातून चांगला दबदबा निर्माण केला आहे.मागील महिन्यात चोंडी येथे मंत्रिमंडळ बैठक व त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अनेक मंत्री, आमदारांना पाचारण करून कोट्यवधी रुपयांचा निधी जामखेड तालुक्यासाठी मंजूर करून घेतला आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्या कारणाने भाजपाच विकास करू शकतो ही भावना राजकीय कार्यकर्ते व जनतेमध्ये चर्चिली जात आहे.
अहिल्यानगर जिल्हा परिषद वर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी सभापती प्रा.राम शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व महायुतीचे सर्वच आमदार आतापासूनच कामाला लागले आहेत.
जामखेड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी भाजपा कडून अनेक इच्छुक आहेत यामध्ये खर्डा जिल्हा परिषद गटातून रवींद्र सुरवसे, नंदू आबा गोरे, महेंद्र मोहोळकर, वैजिनाथ पाटील तर खर्डा पंचायत समिती गणासाठी बाजीराव गोपाळघरे, नंदकुमार गोरे, बाळासाहेब गोपाळघरे, महालिंग कोरे, तर नान्नज गणातून सुनील हजारे, महिंद्र मोहोळकर, उदयसिंह पवार हे इच्छुक आहेत.
जवळा जिल्हा परिषद गटातून राजू देशपांडे, बापूराव ढवळे, प्रशांत शिंदे, लहू शिंदे, डॉक्टर गणेश जगताप, अजय सातव हे इच्छुक असून नान्नज पंचायत समिती गणातून मनीषाताई मोहोळकर, प्रशांत शिंदे, पांडुरंग उबाळे, उमेश रोडे तर अरणगाव पंचायत समिती गणातून महादेव ओंबाशे,अंकुश शिंदे, अशोक महारनवर, सुहास वारे, करण ढवळे, राऊत मेजर हे इच्छुक दिसत आहेत.
साकत जिल्हा परिषद गटातून अजय काशीद, भगवान मुरूमकर, सचिन घुमरे हे इच्छुक असून साकत पंचायत समिती गणातून काकासाहेब गर्जे,महारुद्र महारनवर, मोहिते सर, भीमराव कापसे,विकास सांगळे,कांतीलाल वराट तर शिऊर पंचायत समिती गणातूनही अनेक इच्छुक ऐनवेळी उमेदवार साठी वाढणार आहे. जशी जशी निवडणूक जवळ येईल त्या पद्धतीने भाजपाकडून इच्छुकांची गर्दी होणार असल्याने सध्यातरी जामखेड तालुक्यात भाजपाकडून उमेदवारी करण्यासाठी कार्यकर्त्यांची रस्सीखेच होणार असल्याचे चित्र आगामी काळात दिसून येणार आहे.
No comments:
Post a Comment