स्टॅन्ड पोस्टला नळ कनेक्शन देण्याच्या योजनेचा खर्ड्यात बोजवारा, आर्थिक घोटाळा झाल्याचा नागरिकांचा आरोप..
याबाबत माहिती अशी की,खर्डा शहरात सध्या सिमेंट काँक्रीटचे स्टॅन्ड पोस्ट नळ कनेक्शन देण्याच्या योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे.या योजनेतून नागरिकांना पाणी देण्याचा उद्देश आहे परंतु त्या नळाला कनेक्शनच नाहीत तर निव्वळ स्टॅन्ड पोस्ट बोगस उभे केले असून त्याद्वारे लाखो रुपयांचा मलिदा लाटण्याचा प्रयत्न खर्डा ग्रामपंचायतचे पदाधिकारी करीत असल्याचा आरोप अनेक नागरिकांनी केला आहे.येथील वॉर्ड क्र.2 किंवा अन्य ठिकाणी जलजीवन योजनेतून प्रत्येकी सर्व कुटुंबाने नळ कनेक्शन घेतले आहे,त्यानंतर त्या ठिकाणी सिमेंट रस्त्यांची कामे विविध योजनेतून खर्डा ग्रामपंचायतने केले आहेत व राहिलेले कामे अनेक ठिकाणी झाले आहेत, परंतु सध्या स्टॅन्ड पोस्ट हे खर्डा शहरात नळ कनेक्शन देण्याच्या नावाखाली सिमेंटच्या नळाचे बोगस पोल उभे केले जात आहेत.त्याला जलजीवन योजनेच्या पाईप लाईनचे कनेक्शनच दिले नाहीत.फक्त बोगस सिमेंट कनेक्शन पोल बसविण्यात आले आहेत, त्याद्वारे एक थेंबही पाणी नळाला येणार नाही अशा अनेक ठिकाणी असे सिमेंटचे नळ कनेक्शनचे स्टॅन्ड पोस्ट तुटून आत्ताच उलते पालते पडले आहेत. याबाबत माहिती घेतली असता पंधराव्या वित्त आयोगातून ही योजना मार्गी लावण्याचे काम ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे,यासाठी दहा लाख रुपयांचा निधी खर्च होणार आहे.अशा प्रकारे खर्डा शहरात पाणीपुरवठाचे नळ कनेक्शन न देता या योजनेच्या माध्यमातून प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून पैसे हडप करण्याचा प्रयत्न असल्याचे नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.याबाबत लवकरच उपोषण करणार असल्याचे अनेक ग्रामस्थांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment