खर्डा.(प्रतिनिधी)
खर्डा येथील गजानन नगर येथे नागपंचमी सणाच्या निमित्ताने विविध पारंपरिक खेळ व उत्साहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिलांनी गाणी, उखाणे, संगीत खुर्ची, फेर तसेच पारंपारिक खेळ यामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी आपला सहभाग नोंदवला.
नागपंचमी हा सण केवळ पूजा आणि अर्चना पुरता मर्यादित न राहता भक्ती, सांस्कृतिक उत्साह, निरोगी समाज आणि निसर्गाशी सुसंवाद या सर्वांचा संगम आहे.
याप्रसंगी सौ चंदाताई गोलेकर, सौ. प्रतीक्षा म्हेत्रे, सौ. स्वाती खिस्ते, सौ. साक्षी बजगुडे, सौ. उर्मिला खेडकर, सौ. द्रोपदी जायभाय, सौ. अपर्णा बारटक्के, सौ. राधिका घोडके, सौ. ज्योती बारगजे, डॉ. सुवर्णा खोत, वायकर मॅम, मुक्ता रणसिंग, सौ. सोनाली पोतरे, सौ. स्वाती महाडिक. आदी याप्रसंगी उपस्थित होत.
No comments:
Post a Comment