जामखेड प्रतिनिधी
खर्डा व परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखली जाईल यामध्ये कोणाचीही केली जाणार नसल्याचे प्रतिपादन नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी सांगितले.
यावेळी खर्डा प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष थोरात,पत्रकार दत्तराज पवार, बाळासाहेब शिंदे, किशोर दुशी यांनी आपले मनोगत व्यक्त करून पोलीस प्रशासनाने पत्रकारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पुढे बोलताना उज्वलसिंह राजपूत म्हणाले की, मला पोलीस खात्यात काम करण्याचा अनुभव आहे. मी मुंबई,नाशिक, येवला व अहमदनगर या ठिकाणी काम केले आहे खर्डा येथील पोलीस ठाण्यात मी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, तसेच मुलींच्या छेडछाड, गुन्हेगारी प्रवृत्तीचा बीमोड करणार असल्याचे सांगितले.त्याचबरोबर येथील पत्रकारांना सर्वतोपरी सहकार्य करू असे शेवटी बोलताना ते म्हणाले.
याप्रसंगी धनसिंग साळुंखे, रिजवान बागवान, पोलीस कॉन्स्टेबल शेषराव मस्के,अमोल कोठावळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment