जामखेड प्रतिनिधी
ठक्कर बाप्पा योजनेतून आदिवासी पारधी समाजाला ग्रामपंचायतच्या सहकार्याने हक्काची जागा व घरकुले मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उद्गार वंचित बहुजन आघाडीचे अँड.अरुण जाधव यांनी सांगितले.
ते खर्डा येथे कानिफनाथ वस्ती जवळ पारधी समाजाची घरकुलासाठी बैठक नुकतीच पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीचे अध्यक्षस्थानी खर्डा गावचे सरपंच संजीवनी पाटील ह्या होत्या, त्या बैठकी मध्ये सरपंच संजीवनी पाटील म्हणाल्या की, पारधी समाजाला घरकुल व घरासाठी जागा, पाण्याची सोय, लाईटची सोय हा प्रश्न आम्ही ह्या महिन्यांमध्ये सोडवू व लवकरच आदिवासी समाजांला प्रत्येकी एक गुंठा जागा देऊन ग्रामपंचायत ठराव घेऊन घरकुलाची मागणी करणार असल्याचे सांगितले.
तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अरुण जाधव यांनी सरपंचाचे विशेष कौतुक केले तसेच आदिवासी पारधी समाज यांना ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत घरकुल मिळण्यासाठी जे प्रयत्न लागेल ते मी व ग्रामपंचायत एकत्र येऊन करू जसे की मदारी समाजांना यशवंतराव मुक्त वसाहत योजने अंतर्गत घरकुले मिळाले तसे ठक्कर बाप्पा योजनेसाठी आपण प्रयत्न करून आदिवासी समाजाची वसाहत लवकरात लवकर उभी करण्यासाठी प्रयत्न करू असे जाधव यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमासाठी मार्केट कमिटीचे संचालक वैजिनाथ पाटील, विशाल पवार, वंचित चे तालुका अध्यक्ष आतिश पारवे, राजू शिंदे, नीता इंगळे, उर्मिला कवडे,राणी खटावकर ,लहू पवार, ललिता काळे, चंद्रकला पवार,लक्ष्मी काळे, सचिन शिंदे, फकीर मदारी, हुसेन मदारी इत्यादी सह महिला भगिनी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment