जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथे 15 जून 2025 रोजी संध्याकाळी बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल चोरी गेल्याची घटना घडली असून याबाबत विनोद बबन हजारे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी जामखेड येथे करमाळा रोड द्रोणागिरी कॉलनीमध्ये राहत असून माझी समर्थ सेल्स नावाची कोल्डिंग एजन्सी आहे. त्यासमोर माझ्या कामगाराने बजाज मोटरसायकल MH -16 C F 1049 दिनांक 15 रोजी संध्याकाळी लावली होती, त्यानंतर त्याने मला फोन करून सांगितले की मी एजन्सी समोर मोटरसायकल लावून जेवण करून झोपी गेलो होतो, परंतु दुसऱ्या दिवशी मी सकाळी दहा वाजता आलो असता मला एजन्सी समोर मोटरसायकल दिसून आली नाही असे त्याने मला सांगितले. त्यानंतर मी व माझे नातेवाईक अतुल खेत्रे,अंगद बोराटे व राजू भुजबळ असे त्या ठिकाणी गेलो. नंतर आम्ही जामखेड शहरात व आसपासच्या ठिकाणी मोटरसायकलचा शोध घेतला परंतु मला माझी मोटरसायकल मिळाली नाही त्यामुळे माझी खात्री झाली की माझी बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्या करिता चोरून नेहली आहे, अशी फिर्याद विनोद हजारे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत ठाणे अंमलदार सरोदे यांनी मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वीही अनेक मोटरसायकल चोरीचा प्रकार जामखेड मध्ये सातत्याने होत आहे अशा चोरट्यांचा पोलिसांनी मुसक्या आवळून बंदोबस्त करावा अशी मागणी जामखेडकरांनी केली आहे.
No comments:
Post a Comment